आपला ई-मेल पत्ता अपडेट करण्याच्या पद्धती

आपल्या खात्याला अद्ययावत ई-मेल पत्ता संलग्न असणे हे खात्याच्या सुधारित सुरक्षेच्या दिशेने एक उत्तम पाऊल आहे.

नोट: आपल्या Twitter खात्याशी संबंधित ई-मेल पत्ता दरवेळी अपडेट केला की आपल्याला या बदलाबाबत चेतावणी देण्यासाठी आम्ही आधी वापरलेल्या ईमेल पत्त्यावर ई-मेल सूचनापत्र पाठवू. अशाप्रकारच्या चेतावणींबाबत अधिक माहितीसाठी, खाते सुरक्षेविषयी वाचा. त्याशिवाय, आम्ही आपला यापूर्वी संग्रहित केलेला ई-मेल पत्ता वापरत राहू आणि सुरक्षितता आणि सुरक्षेच्या उद्देशांसाठी ही माहिती वापरू. आपला Twitter डेटा वरून आपला डेटा डाउनलोड करून आपण आपल्या खात्याशी संबंधित ई-मेल पत्त्यांचा संपूर्ण इतिहास अॅक्सेस करू शकता.

आपला ई-मेल पत्ता अपडेट करा
1 पायरी

 नॅव्हिगेशन मेनू प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

2 पायरी

खाते टॅप करा.

3 पायरी

ई-मेल टॅप करा.

4 पायरी

आपला ई-मेल पत्ता प्रविष्ट करून पूर्ण झाले टॅप करा. 
नोट: एका वेळी एका Twitter खात्यावर एकच ई-मेल पत्ता संबंधित असू शकतो.

1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.

2 पायरी

खाते टॅप करा.

3 पायरी

ई-मेल टॅप करा.

4 पायरी

आपला ई-मेल पत्ता अंतर्भूत करा आणि पुढील टॅप करा.
नोट: एका वेळी एका Twitter खात्यावर एकच ई-मेल पत्ता संबंधित असू शकतो.

1 पायरी

Twitter.com मध्ये लॉग इन करा आणि अधिक  प्रतीक क्लिक करून आपल्या खाते सेटिंग्ज पृष्ठावर जा आणि नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.

2 पायरी

 आपले खाते क्लिक करा.

3 पायरी

 खाते माहिती क्लिक करून आपला पासवर्ड प्रविष्ट करा.

4 पायरी

 ई-मेल क्लिक करा.

5 पायरी

ई-मेल रकान्यामध्ये आपला ई-मेल पत्ता टाईप करा. 
नोट: एका वेळी एका Twitter खात्यावर एकच ई-मेल पत्ता संबंधित असू शकतो.

6 पायरी

पृष्ठाच्या तळाशी जतन करा बटण क्लिक करा.


नोट: Twitter वर सार्वजनिक प्रोफाइलमध्ये आपला ई-मेल पत्ता प्रदर्शित केला जात नाही. माझ्या ई-मेल पत्त्यावरून इतरांना मला शोधू द्या हे सेटिंग आपण बंद केले नसल्यास ज्यांच्याकडे आपला ई-मेल पत्ता आधीच आहे त्यांना आपले Twitter खाते सापडू शकते. आपल्या ई-मेल आणि फोन क्रमांकाच्या शोधक्षमता गोपनीयता सेटिंग्ज विषयी अधिक जाणून घ्या.
 

आपल्या ई-मेल पत्त्याची पुष्टी करा

आपल्या खात्याला संलग्न असलेला ई-मेल पत्ता जेव्हा आपण अपडेट करता तेव्हा, बदलांची पुष्टी करण्यास सांगणारा ई-मेल आम्ही आपल्याला पाठवू. आम्ही पाठवलेल्या ई-मेलमध्ये, आता पुष्टी करा बटण क्लिक करून आम्हाला कळू द्या की तो ई-मेल पत्ता आपला आहे.

  1. आपण आत्ताच अपडेट केलेल्या पत्त्यासाठी ई-मेल इनबॉक्समध्‍ये लॉग इन करा.
  2. आपल्या खात्याची पुष्टी करण्याचे आमंत्रण देणारा Twitter चा ई-मेल उघडा.
  3. त्या ई-मेलमधील आता पुष्टी करा बटण टॅप करा.
  4. आम्ही आपल्याला आपल्या Twitter खात्याकडे निर्देशित करू आणि आपण जर आधीच लॉग इन केले नसेल तर आम्ही आपल्याला लॉग इन करण्यास सांगू.


नोट: आपण वरील पुष्टीकरण प्रक्रिया पूर्ण न केल्यास, आपला ई-मेल पुष्टी न केलेला राहील. याचा अर्थ आपल्याला ठराविक खाते वैशिष्ट्यांचा लाभ घेता येणार नाही, जसे की आपल्या ट्विट संग्रहाची विनंती करणे किंवा लॉगइन सत्यापन यांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा लाभ घेणे.

हा लेख शेअर करा