हरवलेला किंवा विसरलेला पासवर्ड रिसेट कसा करायचा

आपल्या खात्याचा आपला अॅक्सेस कधीही गमावला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी एक अचूक आणि अद्ययावत ई-मेल पत्ता आणि/किंवा फोन नंबर हे आपण उचलू शकत असलेले एक उत्तम पाऊल आहे. क्षणभर वेळ काढा आणि आपण आपल्या खात्याशी जोडलेला ई-मेल पत्ता आणि/किंवा फोन नंबर अद्ययावत असल्याची खात्री करा.

आपले लॉगिन केलेले असताना आपला पासवर्ड कसा बदलावा

 1. आपल्या लॉगिन केलेल्या खात्यातून, नॅव्हिगेशन बारवरून अधिक   प्रतीक क्लिक करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयतानिवडा.
 2. खाते टॅबमधून, पासवर्ड वर क्लिक करा.
 3. आपला चालू पासवर्ड एंटर करा.
 4. आपला नवीन पासवर्ड निवडा.
 5. सुरक्षित करा क्लिक करून आपले बदल सुरक्षित करा.

Note: जर आपण लॉग इन करू शकला असाल परंतु आपल्याला आपला पासवर्ड आठवत नसेल तर, आपण पासवर्ड सेटिंग्ज पृष्ठावरून स्वतःला पासवर्ड रिसेट ई-मेल पाठवू शकता.

ई-मेलद्वारे स्वतःला पासवर्ड रिसेट कसे पाठवावे.

 1. twitter.com, mobile.twitter.com किंवा iOS किंवा Android साठी Twitter अनुप्रयोगावरून, पासवर्ड विसरला?क्लिक करा
 2. आपला ई-मेल पत्ता, फोन क्रमांक किंवा Twitter उपभोक्ता नाव प्रविष्ट करा. आपल्या फोन क्रमांकाशी अनेक खाती संबंधित असतील तर, या पायरीमध्ये आपण आपला फोन क्रमांक वापरू शकत नाही.
 3. आपल्याला पासवर्ड रिसेट ई-मेल ज्यावर हवा असेल तो ई-मेल निवडा.
 4. आपला ई-मेल इनबॉक्स तपासा. Twitter त्वरित आपल्या खात्याच्या ई-मेल पत्त्यावर संदेश पाठवेल.
 5. त्या ई-मेलमधील रिसेट लिंक क्लिक करा.
 6. नवीन पासवर्ड निवडा.

Note: या ई-मेल्समध्ये समाविष्ट केलेल्या पासवर्ड रिसेट लिंक्स वेळ-संवेदनशील असतात. आपण लिंकवर क्लिक केले आणि ती चालली नाही तर, नवीन लिंकची विनंती करा आणि शक्य तितक्या लवकर ती वापरा.

SMS द्वारे स्वतःला पासवर्ड रिसेट कसे पाठवावे.

आपण आपल्या मोबाईल सेटिंग्जमध्ये, आपल्या खात्यामध्ये आपला फोन क्रमांक जोडला असेल तर, आपल्याला SMS/ मजकूर संदेशाद्वारे पासवर्ड रिसेट मिळू शकते.

 1. पासवर्ड विसरला? पृष्ठावरून, आपला फोन क्रमांक, ई-मेल पत्ता किंवा Twitter उपभोक्ता नाव प्रविष्ट करा.
 2. आपला फोन क्रमांक प्रविष्ट करा आणि शोध क्लिक करा.
 3. [XX] ने शेवट होत असलेल्या माझ्या फोनवर एक कोड मजकूर पाठवा प्रदर्शित होईल. चालू ठेवा क्लिक करा.
 4. Twitter आपल्याला सहा अंकी कोड मजकूर पाठवेल जो 15 मिनिटे वैध असेल.
 5. पासवर्ड रिसेट पृष्ठावर हा कोड मजकूर क्षेत्रात प्रविष्ट करा आणि सबमिट करा क्लिक करा.
 6. त्यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड निवडा असे प्रॉम्प्ट केले जाईल.

Note: लॉगइन सत्यापनमध्ये नावनोंदणी केलेल्या खात्यांना SMS द्वारा पासवर्ड रिसेट उपलब्ध नाही. आपण केवळ ई-मेलद्वारेच आपला पासवर्ड रिसेट करू शकता.

SMS कोड मिळत नाही?

 • आपल्याला कोड मिळण्यास काही मिनिटे लागू शकतात
 • काही मिनिटांनंतर आपल्याला तो मिळाला नाही तर, आपल्याला Twitter कडून SMS सूचनापत्रे मिळत आहेत याची खात्री करण्यासाठी, आपल्या Twitter शॉर्ट कोड ला HELP मजकूर पाठवून पाहा. आपल्याला काही उत्तर आले नाही तर, SMS द्वारा Twitter ची मदत घ्या किंवा ई-मेल पासवर्ड रिसेट पर्याय वापरा.

पासवर्ड रिसेटची विनंती करण्यासाठी अतिरिक्त माहिती आवश्यक ठरणे

जर आपण विनंती न केलेले पासवर्ड रिसेटचे संदेश आपल्याला वरचेवर येत असतील तर, पासवर्ड रिसेट सुरू करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त माहिती प्रविष्ट करावी लागू शकते:

 1. twitter.com द्वारे, आपल्या खाते सेटिंग्जला जा.
 2. सुरक्षा विभागात, पासवर्ड रिसेट संरक्षण याच्या पुढील चौकटीत खूण करा. 
 3. पासवर्ड रिसेट ई-मेल किंवा SMS/मजकूर पाठवण्यासाठी, आपल्याला आपल्या खात्याचा ई-मेल पत्ताकिंवा दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
  • आपला खात्याचा ई-मेल पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक दोन्ही आपल्या खात्याशी संबंधित असेल तर, पासवर्ड रिसेट ई-मेल किंवा SMS/मजकूर पाठवण्यासाठी आपल्याला दोन्ही प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.

Bookmark or share this article