तृतीय-पक्ष अनुप्रयोग आणि लॉग इन सत्रांविषयी

तृतीय-पक्ष अनुप्रयोग Twitter प्लॅटफॉर्मवर बाह्य विकसकांकडून तयार केले जातात आणि ते Twitter च्या मालकीचे नसतात किंवा त्यावरून संचालित होत नाहीत. जेव्हा आपण आपल्या Twitter खात्याशी तृतीय-पक्ष अनुप्रयोग कनेक्ट करता, तेव्हा आपण त्या अनुप्रयोगाला आपले खाते वापरण्याची मंजूरी देता. त्याच्या परवानग्यांनुसार प्रमाणित अनुप्रयोग विविध प्रकारे आपल्या खात्यामधून माहिती मिळविण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी सक्षम असू शकतो, जसे की आपले ट्विट वाचणे, आपण कोणाला फॉलो करता ते पाहणे, आपला प्रोफाइल अद्यतनित करणे, आपल्या वतीने ट्विट पोस्ट करणे, आपले थेट संदेश ऍक्सेस करणे किंवा आपला ई-मेल पत्ता पाहणे. आपण विशिष्ट अॅक्सेस विषयी अनुप्रयोग परवानग्या विभागात अधिक जाणून घेऊ शकता.

नोट: कोणत्याही तृतीय-पक्ष अनुप्रयोगावरून आपले खाते अॅक्सेस करण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपल्या खात्यामध्ये अनुप्रयोगाला अॅक्सेस देणे आपल्याला योग्य वाटत नसल्यास, तो रद्द करण्यासाठी केवळ प्रमाणिकरण पृष्ठावरील रद्द करा येथे क्लिक करा. ज्या तृतीय-पक्ष अनुप्रयोगांना आपले खाते वापरण्यासाठी अॅक्सेस आहे, अशा अनुप्रयोगांना आपणास अजूनही अॅक्सेस द्यायचा असल्यास पुष्टीकरण करण्यासाठी आम्ही आपल्याला नियमितपणे त्यांचे पुनरावलोकन करण्यास देखील सुचवितो. आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागामधून आपण अनुप्रयोगांचे पुनरावलोकन करून त्यांचा अॅक्सेस रद्द करू शकता.

त्याशिवाय, आपण आपल्या सक्रिय Twitter सत्रांमधून कसे लॉग आउट करावे ते खालील माहितीवरून जाणून घेऊ शकता.

तृतीय-पक्ष अनुप्रयोग कनेक्ट करण्याच्या पद्धती
1 पायरी

आपणास जो अनुप्रयोग कनेक्ट करायचा आहे त्या अनुप्रयोगामध्ये आपले Twitter खाते कनेक्ट करण्यास सांगणारे बटण/लिंक (सर्वसाधारणपणे "Twitter शी कनेक्ट करा", "Twitter द्वारे साइन इन करा" किंवा तत्सम) शोधा.

2 पायरी

अनुप्रयोगानुसार खाते वापरण्यासाठी अनुप्रयोग अधिकृत करण्यास सांगून Twitter कडून संमतीचा डायलॉग सादर केला जाऊ शकतो किंवा आपणास आपल्या iOS उपकरणावरील Twitter खात्यांवर अनुप्रयोगाला अॅक्सेस देण्यास सूचित केले जाऊ शकते.

3 पायरी

अनुप्रयोगाला मंजुरी देत असलेल्या विविध परवानग्यांचे आपण पुनरावलोकन करू शकता. अनुप्रयोग आपल्या खात्याचा वापर करून पार पाडू शकेल अशा कृतींची उदाहरणे आपल्याला दिसतील.

4 पायरी

आपल्याला Twitter वेबसाईटवर निर्देशित केले जात असल्यास आणि आपण आधीपासून आपल्या खात्यामध्ये लॉग इन केले असल्यास अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी अनुप्रयोग प्रमाणित करा बटण वापरा. आपल्या खात्यामध्ये आपण आधीपासून लॉग इन केले नसल्यास आपणास ते करावे लागेल. आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करण्यापूर्वी, https://twitter.com ने URL ची सुरुवात होते हे सत्यापित करून पृष्ठ सुरक्षित आहे हे पहा. पृष्ठ सुरक्षित असल्यास, आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करून अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी साइन इन करा बटण वापरा.

5 पायरी

अनुप्रयोगाला आपल्या iOS उपकरणावरील Twitter खात्यांमध्ये अॅक्सेस मंजूर करण्यास आपल्याला सूचित केले असल्यास, अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी कनेक्ट करा बटण वापरा. आपल्या उपकरणावर एकाधिक Twitter खाती असल्यास, आपणास जे खाते अनुप्रयोगाशी कनेक्ट करायचे आहे ते कदाचित आपल्याला निवडावे लागेल.

नोट: आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागावर जाऊन आपण अनुप्रयोगांचे पुनरावलोकन करू शकता आणि त्यांचा अॅक्सेस कधीही रद्द करू शकता.

1 पायरी

आपणास जो अनुप्रयोग कनेक्ट करायचा आहे त्या अनुप्रयोगामध्ये आपले Twitter खाते कनेक्ट करण्यास सांगणारे बटण/लिंक (सर्वसाधारणपणे "Twitter शी कनेक्ट करा", "Twitter द्वारे साइन इन करा" किंवा तत्सम) शोधा.

2 पायरी

अनुप्रयोगानुसार अनुप्रयोगाला आपले खाते वापरण्यासाठी अधिकृत करण्याकरिता आपणास Twitter वेबसाइट किंवा Twitter for Android अनुप्रयोगाकडे निर्देशित केले जाऊ शकते.

3 पायरी

अनुप्रयोगाला मंजुरी देत असलेल्या विविध परवानग्यांचे आपण पुनरावलोकन करू शकता. अनुप्रयोग आपल्या खात्याचा वापर करून पार पाडू शकेल अशा कृतींची उदाहरणे आपल्याला दिसतील.

4 पायरी

आपल्याला Twitter वेबसाईटवर निर्देशित केले जात असल्यास आणि आपण आधीपासून आपल्या खात्यामध्ये लॉग इन केले असल्यास अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी अनुप्रयोग प्रमाणित करा बटण वापरा. आपल्या खात्यामध्ये आपण आधीपासून लॉग इन केले नसल्यास आपणास ते करावे लागेल. आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करण्यापूर्वी, https://twitter.com ने URL ची सुरुवात होते हे सत्यापित करून पृष्ठ सुरक्षित आहे हे पहा. पृष्ठ सुरक्षित असल्यास, आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करून अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी साइन इन करा बटण वापरा.

5 पायरी

आपणास Twitter for Android वर निर्देशित केले असल्यास, अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी परवानगी द्या किंवा कनेक्ट करा बटण वापरा. आपल्या उपकरणावर एकाधिक Twitter खाती असल्यास, आपणास जे खाते अनुप्रयोगाशी कनेक्ट करायचे आहे ते आपल्याला निवडावे लागेल.

नोट: आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागावर जाऊन आपण अनुप्रयोगांचे पुनरावलोकन करू शकता आणि त्यांचा अॅक्सेस कधीही रद्द करू शकता.

1 पायरी

आपण ज्या अनुप्रयोगाच्या वेबसाईटवर कनेक्ट करायचे आहे त्यावर आपले Twitter खाते (सर्वसाधारणपणे "Twitter शी कनेक्ट करा", "Twitter वरून साइन इन करा" किंवा तत्सम) कनेक्ट करायला सांगणारे बटण/लिंक शोधा.

2 पायरी

आपणास आपले खाते वापरण्यासाठी अनुप्रयोग अधिकृत करण्यास सांगून Twitter वेबसाईटवर निर्देशित केले जाईल.

3 पायरी

अनुप्रयोगाला मंजुरी देत असलेल्या विविध परवानग्यांचे आपण पुनरावलोकन करू शकता. अनुप्रयोग आपल्या खात्याचा वापर करून पार पाडू शकेल अशा कृतींची उदाहरणे आपल्याला दिसतील.

4 पायरी

आपण आपल्या खात्यामध्ये आधीपासून लॉग इन केले असल्यास, अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी अनुप्रयोग प्रमाणित करा बटण वापरा.

5 पायरी

आपल्या खात्यामध्ये आपण आधीपासून लॉग इन केले नसल्यास आपणास ते करावे लागेल. आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करण्यापूर्वी, https://twitter.com ने URL ची सुरुवात होते हे सत्यापित करून पृष्ठ सुरक्षित आहे हे पहा. पृष्ठ सुरक्षित असल्यास, आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करून अनुप्रयोग कनेक्ट करण्यासाठी साइन इन करा बटण वापरा.

6 पायरी

आपण आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागाला भेट देऊन कधीही आपल्या खात्याशी कनेक्ट केलेल्या अनुप्रयोगांचे पुनरावलोकन आणि ते रद्द करू शकता.


अनुप्रयोगाच्या परवानग्या


आपले Twitter खाते वापरून विविध कार्ये करण्यासाठी तृतीय-पक्ष अनुप्रयोगांकडून अॅक्सेसची विनंती केली जाऊ शकते. आपल्या खात्यामधील विशिष्ट माहिती अॅक्सेस करण्यासाठी आणि विशिष्ट कार्ये करण्यासाठी अनुप्रयोगावरून खालील परवानग्या मागितल्या जाऊ शकतात:


वाचा

ज्या अनुप्रयोगांकडे आपल्या Twitter खात्यामधील रीड अॅक्सेस आहे, असे अनुप्रयोग खालील गोष्टी करण्यास कार्यक्षम असतील:

 • प्रोफाइल माहिती: आपली प्रोफाइल माहिती पहा, जसे की आपले नाव, ठिकाण, वर्णन आणि प्रोफाइल आणि हेडर छायाचित्र. आपल्या Twitter खात्याशी संलग्न असलेला ई-मेल पत्ता आणि आपला फोन क्रमांक याचा प्रोफाइल माहिती म्हणून विचार केला जात नाही याची नोंद घ्या. आपण जोवर अनुप्रयोगाला आपला ई-मेल पत्ता पाहण्याची विशिष्ट परवानगी देत नाही तोपर्यंत अनुप्रयोगावरून तो पाहिला जाणार नाही. 

 • ट्विट्स: कोणत्याही संरक्षित ट्विट्ससह, आपली ट्विट्स (एखादे ट्विट किती वेळा पाहिले गेले ती संख्या आणि ट्विटसह इतरांनी केलेले परस्परसंवाद यांसारख्या तपशीलांसह) आणि आपण आपल्या टाइमलाइनवर ज्या खात्यांना फॉलो करता त्या खात्यांमधील ट्विट्स पहा. 

 • खाते सेटिंग्ज: आपली खाते सेटिंग्ज पहा, जसे की आपली प्राधान्य दिलेली भाषा आणि टाइम झोन. 

 • इतर खाती: आपण कोणाला फॉलो करता, म्यूट करता आणि अवरोधित करता ते पहा.

 • याद्या: आपल्या Twitter खात्यांची यादी पहा.

 • कलेक्शन्स: आपल्या ट्विट्सची कलेक्शन्स पहा.
   

वाचा आणि लिहा

ज्या अनुप्रयोगांकडे आपल्या Twitter खात्यामधील लिहिण्याचा आणि वाचनाचा अॅक्सेस आहे त्या अनुप्रयोगांकडे वरील वाचा विभागात वर्णन केल्यानुसार आपली माहिती पाहण्याचा अॅक्सेस असेल तसेच, हे करण्याची क्षमता देखील असेल:

 • प्रोफाइल माहिती: आपल्यासाठी आपली प्रोफाइल माहिती अद्यतनित करणे. 

 • ट्विट्स: आपल्यावतीने ट्विट्स आणि मीडिया पोस्ट करणे, आपल्यासाठी ट्विट्स हटवणे आणि आपल्यासाठी इतरांनी पोस्ट केलेल्या ट्विट्समध्ये सहभागी होणे (उदाहरणार्थ, ट्विटला पसंती देणे, पसंती रद्द करणे किंवा प्रत्युत्तर देणे, पुन्हा ट्विट करणे इ.) 

 • खाते सेटिंग्ज: आपल्यासाठी आपली खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करणे. 

 • इतर खाती: आपल्यासाठी खाती फॉलो आणि अनफॉलो करणे आणि आपल्यावतीने खाती म्यूट, अवरोधित करणे किंवा ती रिपोर्ट करणे.

 • याद्या: आपल्यासाठी Twitter खात्यांच्या याद्या करणे, आपल्यासाठी आपल्या याद्या व्यवस्थापित करणे (उदाहरणार्थ, याद्यांमध्‍ये खाती जोडणे आणि काढणे) आणि आपल्यासाठी आपल्या याद्या हटवणे.

 • कलेक्शन्स: आपल्यासाठी ट्विट्सचे कलेक्शन्स तयार करणे, आपल्यासाठी आपले कलेक्शन्स व्यवस्थापित करणे (उदाहरणार्थ, कलेक्शन्समध्ये खाती समाविष्ट करणे आणि काढून टाकणे) आणि आपल्यासाठी आपले कलेक्शन्स हटवणे. 
   

वाचा, लिहा आणि थेट संदेश

ज्या अनुप्रयोगांकडे आपल्या Twitter खात्यामधील वाचनाचा, लिहिण्याचा आणि थेट संदेशांचा अॅक्सेस आहे त्या अनुप्रयोगांकडे उपरोक्त वाचा आणि लिहा विभागात वर्णन केल्यानुसार आपली माहिती पाहण्याचा आणि कृती करण्याचा अॅक्सेस असेल तसेच त्यावरून पुढील कार्ये करणे शक्य होईल: आपल्यासाठी थेट संदेश पाठविणे, आपण पाठविलेले आणि आपल्याला मिळालेले थेट संदेश पाहणे आणि आपले थेट संदेश व्यवस्थापित करणे आणि हटवणे. प्रत्येक संप्रेषण करणाऱ्या सहभाग्याकडे संप्रेषणाची त्यांची स्वत:ची प्रत असते याची नोंद घ्या — थेट संदेश हटविण्यामुळे आपल्या खात्यामधून तो काढून टाकला जाईल, संप्रेषणात असलेल्या इतर सहभाग्यांच्या खात्यांमधून नाही.
 

ई-मेल पत्ता

तसेच, उपरोक्त परवानग्यांशिवाय Twitter खात्याशी संबंधित असलेला ई-मेल पत्ता पाहण्याची परवानगी देखील अनुप्रयोगांकडून मागितली जाऊ शकते.
 

Twitter जाहिराती

आपण Twitter जाहिराती वापरत असल्यास, अनुप्रयोगांकडून खालील गोष्टींची देखील विचारणा केली जाऊ शकते:

 • विश्लेषण: आपल्या मोहीमा, प्रेक्षक, व्यवसाय आणि जाहिरात खात्याची माहिती (जसे की खात्याचे नाव, ID आणि तयार केल्याची तारीख, व्यवसायाचे नाव, टाइमझोन आणि उपभोक्ते), जाहिरात खाते आणि उपभोक्ता सेटिंग्ज (जसे की सूचनापत्र ई-मेल, संपर्क फोन क्रमांक आणि विस्तारणे, उद्योगाचा प्रकार, ई-मेल सबस्क्रीप्शन सेटिंग्ज आणि टॅक्स सेटिंग्ज) आणि क्रिएटिव्ह आणि मीडियासहित आपल्या जाहिरात डेटाचा अॅक्सेस.

 • मोहीम आणि खाते व्यवस्थापन: उपरोक्त वर्णन केल्यानुसार आपल्या जाहिरातीकरणाचा डेटा अॅक्सेस करा, आणि आपला जाहिरातीकरणाचा डेटा (जसे की मीडिया, क्रिएटिव्ह, मोहीमा आणि प्रेक्षक) आपल्यासाठी तयार करून व्यवस्थापित करा आणि आपले खाते (जसे की खाते नाव, उद्योगाचा प्रकार, खाते आणि उपभोक्ता सेटिंग्ज इ.) व्यवस्थापित करा.  
   

एकाधिक उपभोक्ता लॉगइनवरून आपल्या Twitter जाहिराती खात्यामध्ये अॅक्सेस देण्याविषयी अधिक जाणून घ्या.

आम्ही आपला Twitter पासवर्ड अनुप्रयोगांवरून शेअर करीत नाही. आपल्या Twitter खात्यात अॅक्सेस करण्यासाठी किंवा आपल्या वतीने कार्यवाही करण्यासाठी आपण एखाद्या अनुप्रयोगास प्रमाणित करता, तेव्हा अनुप्रयोगाकडून आपली माहिती त्याच्या स्वतःच्या व्यवसाय पद्धतीनुसार वापरू, संचयित आणि शेअर केली जाऊ शकते. जेव्हा अनुप्रयोग विकसक आमच्या नियमांना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास मंजुरी देतात तेव्हा आपल्या खात्यामध्ये अॅक्सेस देण्यास अनुप्रयोगाला प्रमाणित करण्यापूर्वी आपण अनुप्रयोगाच्या अटी आणि गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करण्याची आम्ही आग्रहाने शिफारस करतो.

तृतीय-पक्ष अनुप्रयोग विकसकांसाठी असलेल्या आमच्या नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांविषयी विकासक धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या.
 

अॅक्सेस रद्द करणे किंवा अनुप्रयोग काढून टाकण्याच्या पद्धती
 1. आपल्या खात्यामध्ये साइन इन करा.
 2. आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागावर जा. आपल्या खात्याशी कनेक्ट केलेले सर्व अनुप्रयोग प्रदर्शित केले जातील. अनुप्रयोगाचे नाव आणि वर्णनाखाली सूचीबद्ध केलेल्या प्रत्येक अनुप्रयोगाकडील आपले खाते वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट परवानग्या आपण पाहू शकता.

 3. आपल्या खात्यामधून आपणास अनुप्रयोग डिस्कनेक्ट करायचा असल्यास अनुप्रयोगाच्या नावावर क्लिक केल्यानंतर अनुप्रयोगापुढील किंवा पृष्ठाच्या तळाशी अॅक्सेस रद्द करा बटणावर क्लिक करा.


एखादा अनुप्रयोग आपले खाते अॅक्सेस करण्यासाठी पासवर्ड विचारत असल्यास


आपणास एखाद्या तृतीय-पक्ष अनुप्रयोगासाठी आपल्या खात्याचा अॅक्सेस मंजूर करायचा असल्यास, केवळ Twitter ची OAuth पद्धत वापरूनच आपण तो मंजूर करण्याची आम्ही शिफारस करतो. OAuth ही एक सुरक्षित कनेक्शन पद्धत असून त्यासाठी आपण आपले Twitter उपभोक्ता नाव आणि पासवर्ड तृतीय पक्षास देण्याची आवश्यकता नसते. आपल्याला अनुप्रयोगास किंवा वेबसाइटला आपले Twitter उपभोक्ता नाव आणि पासवर्ड देण्यास सांगितले जाते तेव्हा आपण विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड देता, तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे आपले खाते नियंत्रित करू शकते आणि आपणास आपले खाते अॅक्सेस करण्यास प्रतिबंधित करू शकते किंवा आपले खाते स्थगित होण्यास कारणीभूत ठरेल अशा कृती करू शकते.

लॉगइन पृष्ठावरून तृतीय-पक्षाच्या अनुप्रयोगासाठी OAuth (पद्धत) वापरली आहे किंवा नाही याविषयी आपल्याला खात्री नसल्यास, थेट twitter.com वर जा आणि आपले क्रेडेन्शिअल्स तेथे प्रविष्ट करून त्यानंतर पुन्हा अनुप्रयोगामध्ये नॅव्हिगेट करा. अनुप्रयोगाकडून OAuth वापरली जात असल्यास आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड पुन्हा प्रविष्ट करण्याची अनुप्रयोगाला आवश्यकता नसते. आपण twitter.com वर आहात हे कसे पाहावे याविषयी आपण आमच्या खाते सुरक्षितता टिप्सवरून अधिक जाणून घेऊ शकता.

एखाद्या अनुप्रयोगाला आपण पूर्वी दिलेल्या पासवर्ड विषयी आपणास आता खात्री नसल्यास त्याचा अॅक्सेस आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागामध्ये रद्द करून आपला पासवर्ड बदला.

नोट: आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड विषयी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक असून आपण तो खालील परिस्थितीमध्ये कधीही देऊ नये:

एखादा नित्कृष्ट अनुप्रयोग अजूनही आपल्या खात्याशी कनेक्ट केला असल्याचा आपल्याला संशय असल्यास


तात्काळ त्याचा अॅक्सेस आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागामध्ये रद्द करून आपला पासवर्ड बदला. आपल्याला अनुप्रयोगाबाबत समस्या येत असल्यास, कृपया अधिक माहितीसाठी समेट घडविलेली खाती हा लेख वाचा.

आपल्याला तृतीय-पक्ष अनुप्रयोगाबाबत समस्या येत असल्यास


तृतीय पक्ष अनुप्रयोग हे Twitter च्या मालकीचे नसल्यामुळे आणि त्यांच्याकडून परिचालित केले जात नसल्यामुळे, आम्ही त्यांचे समस्यानिवारण करू शकणार नाही. आपल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी अनुप्रयोग विकासकाशीसंपर्क साधणे किंवा आपल्याला त्यांच्या उत्पादनात येणाऱ्या समस्यांविषयी त्यांना कळवणे उत्तम असते.

आपल्या सक्रिय Twitter सत्रांमधून लॉग आउट करण्याच्या पद्धती

 1. आपल्या खात्यामध्ये साइन इन करा.
 2. आपल्या सेटिंग्ज आणि गोपनीयतामधून, आपल्या खाते सेटिंग्जच्या अनुप्रयोग आणि सत्रे विभागावर जा. सत्रेच्या खाली आपल्या खात्याशी कनेक्ट केलेली सर्व सक्रिय लॉगइन सत्रे प्रदर्शित केली जातील. आपण लॉगइन केल्याचे ठिकाण आणि वेळ पाहू शकता.

 3. सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही सत्रामधून आपणास लॉग आउट करायचे असल्यास, सत्रापुढील लॉग आउट करा बटणावर क्लिक करा किंवा एकाचवेळी इतर सर्व सत्रे समाप्त करण्यासाठी यादीच्या सर्वात वरती असलेल्या इतर सर्व सत्रांमधून लॉग आउट करा यावर क्लिक करा. कृपया लक्षात घ्या की एखाद्या सत्रामधून लॉग आउट करताना त्या सत्रामधून ट्विट करणे, पसंती देणे आणि प्रत्युत्तर देणे यासारख्या कृती करण्यास प्रतिबंधित केले जाईल, त्यामुळे सत्र सक्रिय असताना यापूर्वी उपकरणावर कॅशे केलेला डेटा (उदा. थेट संदेश) कदाचित हटविला जाणार नाही.

हा लेख शेअर करा