आपले उपभोक्ता नाव कसे बदलावे
यासाठी सूचना पहा:
नोट: आपले उपभोक्ता नाव बदलल्यामुळे आपल्या विद्यमान फॉलोअर्स, थेट संदेश किंवा प्रत्युत्तरांवर परिणाम होणार नाही. जेव्हा आपण आपला प्रोफाइल फोटो अपडेट कराल तेव्हा आपल्या फॉलोअर्सना त्याच्या शेजारी फक्त आपले उपभोक्ता नाव दिसेल. आम्ही सुचवतो की आपण आपले उपभोक्ता नाव बदलण्यापूर्वी आपल्या फॉलोअर्सना चेतावणी द्यावी म्हणजे ते प्रत्युत्तरे किंवा थेट संदेश आपल्या नवीन उपभोक्ता नावाकडे निर्देशित करू शकतील.
आपले उपभोक्ता नाव आणि आपले नाव यात काय फरक आहे?
- आपले उपभोक्ता नाव आपल्या प्रोफाइल URL मध्ये दिसते आणि ते आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असते. ते लॉगिन करण्यासाठी, प्रत्युत्तरांमध्ये आणि थेट संदेशांत वापरले जाते.
- आपले प्रदर्शन नाव हे वैयक्तिक ओळखकर्ता असते (कधीकधी व्यवसाय नाव किंवा खरे नाव) जे आपल्या प्रोफाइल पृष्ठावर प्रदर्शित केले जाते आणि आपल्या मित्रांना आपल्याला ओळखता यावे म्हणून वापरले जाते, विशेषतः आपले उपभोक्ता नाव आपल्या नावाहून किंवा व्यवसाय नावाहून भिन्न असेल तर. आपले उपभोक्ता नाव कसे बदलावे ते जाणून घ्या.
नावे आणि उपभोक्ता नावे किती लांब असू शकतात?
- आपले उपभोक्ता नाव 15 वर्णांइतके लांब असू शकते.
- आपले नाव 50 वर्णांइतके लांब असू शकते.